Devendra Fadnavis : ‘पुढची वाट संघर्षाची पण…’, गटनेते होताच देवेंद्र फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण

| Updated on: Dec 04, 2024 | 1:23 PM

देवेंद्र फडणवीस यांची लोकशाही पद्धतीने गटनेतेपदी निवड झाली. भाजपा महायुतीमधील मोठा पक्ष आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

गेल्या २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालात महायुतीला सर्वाधिक जागा मिळत दणदणीत विजय झाला. मात्र निकाल लागून गेल्यानंतर बरेच दिवस उलटले तरी सत्तास्थानेचा मुहूर्त ठरत नव्हता. मात्र आज राज्यातील सत्तास्थापनेचा मार्ग अखेर मोकळा झाल्याचे पाहायला मिळाले. आज भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. दरम्यान, उद्या 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईतील आझाद मैदानावर भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस राज्याची सूत्रं सांभाळतील. दरम्यान, भाजपच्या विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आपलं पहिलं वहिलं भाषण केले. भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. ‘राज्यातील जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो, असा कौल त्यांनी दिला आहे. विशेषत: या संपूर्ण प्रक्रियेत आपल्यासोबत पूर्णपणे तनमनाने आपल्यासोबत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही मनापासून आभार मानतो. आरपीआयचे नेते रामदास आठवले आणि सर्व मित्र पक्षांचे मनापासून आभार मानतो.’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले,

Published on: Dec 04, 2024 01:23 PM