गणेश नाईक यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख!
देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख कुणी माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते असता करतात. पण मी त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणतो. 2024 मध्ये भाजपची एकहाती सत्ता येईल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं वक्तव्य गणेश नाईक यांनी आपल्या भाषणात केलं.
नवी मुंबइईतील पहिले दिवाळे गाव स्मार्ट व्हिलेजचं उद्घाटन आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सुसज्ज जेट्टी, मच्छिमार बांधवांसाठी सर्व सुविधायुक्त मच्छी आणि भाजी मार्केट, पार्किंग, उद्यान व इतर विविध विकास कामांचं भूमीपूजन करण्यात आलं. यावेळी माजी मंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार रमेश पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी फडणवीसांनी नवी मुंबईत भव्य स्वागत केल्याबद्दल मंदा म्हात्रे आणि कोळी भगिनी आणि विविध बँड पथकांचे आभार मानले. या कार्यक्रमात बोलताना गणेश नाईक यांनी देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला.
देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख कुणी माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते असता करतात. पण मी त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणतो. 2024 मध्ये भाजपची एकहाती सत्ता येईल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. फडणवीस सीएम झाल्यावर कुणाला फोन करण्याची गरज लागणार नाही, असं वक्तव्य गणेश नाईक यांनी आपल्या भाषणात केलं.