नाशिक महानगरपालिकेसाठी फडणवीस मैदानात

| Updated on: Feb 21, 2022 | 11:16 PM

नाशिक महानगरपालिकेची निवडणूक होत आहे, त्यासाठी देवेंद्र फडणवीस आता पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेला डिवचण्याचच काम केले आहे.

नाशिक महानगरपालिकेची निवडणूक होत आहे, त्यासाठी देवेंद्र फडणवीस आता पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेला डिवचण्याचच काम केले आहे. शिवाजी महाराजांच्या भगव्याची काळजी फक्त भाजप पक्षाकडून असून तो आता नाशिक महापालिकेवर भाजपकडूनच फडकवण्यात येईल असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शिवसेनेनं दत्तक या शब्दाचा दलालीखान असा अर्थ घेतला आहे, त्यामुळे दत्तकाचा अर्थ भाजपच जाणून आहे, त्यामुळे नाशिक महानगरपालिकेवर आता भाजपचाच भगवा फडकणार असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याची जबाबदारी आता भाजपवर आहे. नाशिक मनपाची सत्ता महानगरपालिकेकडे आली तर तीन वर्षात मेट्रो आणणार असेही फडणवीस यांनी सांगितले.

Published on: Feb 21, 2022 11:15 PM
आम्ही Rashmi Thackeray यांच्या पाठीशी, मंत्री Yashomati Thakur यांच मोठं वक्तव्य
भीमी कोरेगाव प्रकरणाची सुनावणी 6 महिन्यांत संपेल