‘संजय राऊतांची एक रुपयांच्यावर औकात नाही, त्यांच्यावर मानहानीचा दावा करणार’; कोणी केला हल्लाबोल?

| Updated on: Sep 09, 2024 | 1:23 PM

कोणावर दावा ठोकणार हे प्रकरण न्यायालयात आहे. ही न्यायालयाची बातमी आहे. अभ्यास करा कायद्याने, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले आहे. तर न्यायालयाने एक घटना दाखल करून घेतली आहे. माझ्या माहितीप्रमाणे या संदर्भात मोहनीश जबलपूरे नावाचे एक पिटिशनल आहे. ते या घोटाळ्यासंदर्भात कोर्टात गेले आहेत आणि त्या आधारे ती बातमी आहे, असेही त्यांनी सांगितले

‘सामना’तून खोटे आरोप केले, संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव संदीप जोशी यांनी केले आहे. मी कुठलेही खोटे प्रमाणपत्र दिले नाही, असेही संदीप जोशी म्हणाले. तर संदीप जोशी यांच्या ओरापांवर संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. संदीप जोशी अध्यक्ष असलेल्या सिद्धीविनायक ट्रस्टने खोटे दाखले दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी सामनातून केला. यानंतर “मी कुठलेही खोटे प्रमाणपत्र दिली नाही, जेवढं काम दिलं तेवढीच प्रमाणपत्र दिली. त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. सामनाने खोटी बातमी छापली म्हणून संजय राऊत विरोधात एक रुपयांचा मानहानीचा दावा करणार”, असल्याचे संदीप जोशी यांनी म्हटले. पुढे ते असेही म्हणाले, “संजय राऊत यांची औकात एक रुपयांच्यावर नाही. शक्ती बिल्डकॅामला अजून काम मिळालं नाही. संजय राऊत देवेंद्र फडणवीस द्वेषानं पछाडलेले आहे. शक्ती बिल्डकॅामने आमच्या मंदिराचं काम केलं, त्याचे पुरावे आहे. चेकने पैसे दिलेय”, असेही संदीप जोशी यांनी म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Published on: Sep 09, 2024 01:23 PM
अमित शाहांनी आपल्या पत्नीसह घेतले लालबागच्या राज्याचे आशीर्वाद
कृषिमंत्री धनंजय मुंडे कादर खानचा रोल करतात, कोणी केली टीका?