देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत जाण्याची शक्यता ? सूत्रांची माहिती

| Updated on: Aug 06, 2021 | 6:59 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आज तातडीने दिल्ली रवाना होण्याची शक्यता आहे. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा उद्यापासून चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आज तातडीने दिल्ली रवाना होण्याची शक्यता आहे. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा उद्यापासून चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांचं दिल्लीत काय सुरु आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. देवेंद्र फडणवीस हे सध्या मुंबईत आहेत. मात्र त्यांचा दिल्लीचा कोणताही नियोजित दौरा नाही. पण सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता, देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आजच दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. आधीच आशिष शेलार दिल्लीत आहेत, त्यात चंद्रकांत पाटलांचा नियोजित 4 दिवसांचा दिल्ली दौरा आहे. अशा परिस्थितीत भाजपचे तीन बडे नेते दिल्लीत भेटीगाठी घेत असल्याने महाराष्ट्राच्या नजरा दिल्लीकडे लागल्या आहेत.

Raj Thackeray | राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, तालुका प्रमुख, पदधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार
अल्पवयीन मुलीवर अत्याचार ही शरमेची बाब, कंट्रोल रुममध्ये काहीच न दिसणे हे कोडं, चित्रा वाघ यांचं टीकास्त्र