महाराष्ट्राचा नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?

| Updated on: Nov 26, 2024 | 11:18 AM

टिव्ही ९ मराठीला मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या हायकमांडने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलाय. लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे भाजपचे नेते उघडपणे ऑन कॅमेरा सांगताय...

महायुतीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावर जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मात्र टिव्ही ९ मराठीला मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या हायकमांडने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलाय. लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे भाजपचे नेते उघडपणे ऑन कॅमेरा सांगताय तर एकनाथ शिंदेंना पुन्हा संधी द्या म्हणत शिंदेंच्या नेत्यांनीही मुख्यमंत्रीपदावरून दावा सोडला नाही. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री म्हणून दिल्ली हायकमांडकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कमोर्तब झालंय. तर त्याची घोषणा भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत नेता निवडून होईल. असं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून वारंवार पुढे आणलं जातंय. त्यातच अजित पवार यांचीही एन्ट्री झाली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी २-१-२ असा फॉर्म्युला पुढे आणला गेल्याची माहिती आहे. २-१-२ म्हणजे सुरूवातीचे २ वर्ष भाजप अर्थात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. १ वर्षासाठी मुख्यमंत्रिपज अजित पवारांनी मागितल्याचे कळतंय तर पुढील दोन वर्ष हे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद द्यावं असा फॉर्म्युला चर्चेला आहे.

Published on: Nov 26, 2024 11:18 AM
Sanjay Shirsat : महाराष्ट्राचा CM कोण? मुख्यमंत्रिपदाचा 2-2-1 फॉर्म्युला ठरला? संजय शिरसाट स्पष्ट म्हणाले…
Eknath Shinde : सत्तास्थापनेपूर्वी एकनाथ शिंदेंचं मोठं ट्विट, ‘शिवसैनिकांनी माझ्या समर्थनार्थ एकत्र येऊ नये आणि…’