Video : हिजाबबद्दलचा कोर्टाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा- देवेंद्र फडणवीस

| Updated on: Mar 15, 2022 | 1:07 PM

हिजाब प्रकरणी न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वांनी मान्य करावा, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत. सगळ्यांना धार्मिक स्वातंत्र्य आहे, पण शाळा कॉलेजेसमध्ये ड्रेसकोड असणं गरजेचं आहे,  असंही फडणवीस म्हणाले. “हिजाब (Hijab) धर्माचा अविभाज्य भाग नाही. हिजाब घालणे इस्लाममध्ये बंधनकारक नाही. त्यामुळे शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही, हा सर्वस्वी शाळा (school) प्रशासनाचा अधिकार आहे. त्यावर […]

हिजाब प्रकरणी न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वांनी मान्य करावा, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत. सगळ्यांना धार्मिक स्वातंत्र्य आहे, पण शाळा कॉलेजेसमध्ये ड्रेसकोड असणं गरजेचं आहे,  असंही फडणवीस म्हणाले. “हिजाब (Hijab) धर्माचा अविभाज्य भाग नाही. हिजाब घालणे इस्लाममध्ये बंधनकारक नाही. त्यामुळे शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही, हा सर्वस्वी शाळा (school) प्रशासनाचा अधिकार आहे. त्यावर तेच निर्णय घेतील”, असा ऐतिहासिक निर्णय कर्नाटक हायकोर्टाने (Karnataka High Court) आज (सोमवार) 15 मार्च रोजी दिला. सोबतच या संदर्भातील सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. कर्नाटकातून सुरू झालेलं हिजाब प्रकरण देशभर गाजलं. त्यावर आता आज कर्नाटक हायकोर्टाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.

Published on: Mar 15, 2022 01:06 PM
ठाकरे सरकार सुलतानी पद्धतीनं शेतकऱ्यांची वीज कापतंय- देवेंद्र फडणवीस
VIDEO : हिजाब बद्दलचा कोर्टाचा निर्णय सर्वानी मान्य करावा -Devendra Fadnavis | hijab controversy