Raj Thackeray भाजपबद्दल जे खरं आहे तेच बोलले- देवेंद्र फडणवीस
भाजपसंदर्भात राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे हे सत्यच म्हणाले, असं ते म्हणाले.
भाजपसंदर्भात राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे हे सत्यच म्हणाले, असं ते म्हणाले. “हे सत्यच आहे. भारतीय जनता पार्टी ही सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून आली. भाजपने त्यावेळी शिवसेनेशी युती केली होती. तेव्हा शिवसेनेलाही चांगल्या जागा मिळाल्या. दोघांचे मिळून पूर्ण बहुमत जनतेने दिलं. परंतु त्या बहुमताचा अनादर करून आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून त्याठिकाणी तीन पक्षांची आघाडी झाली. त्यांनी ही सत्ता कपटाने मिळवली, तेच त्यांनी सांगितलंय,” अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.