देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ पत्राला अजित पवार यांच्याकडून केराची टोपली? अन् सुळे-फडणवीसांमध्ये जुगलबंदी

| Updated on: Jan 08, 2024 | 11:42 AM

ज्या नवाब मलिकांवरून महायुतीमध्ये खडा पडला होता, ज्यावरून नवाब मलिकांनी पत्र लिहून अजित पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. त्याच मलिकांवरून अजित पवार गट आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसतंय. कारण मुंबईतील अजित पवार गटाच्या एका बॅनरवर नवाब मलिकांचा फोटो झळकल्याने चर्चांना उधाण

मुंबई, ८ जानेवारी २४ : नवाब मलिक महायुतीमध्ये नको, असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहलं होतं. असं असतानाही अजित पवार गटाच्या बॅनरवर नवाब मलिक यांचा फोटो झळकला. त्यावरून पुन्हा नवा वाद रंगला आहे. ज्या नवाब मलिकांवरून महायुतीमध्ये खडा पडला होता, ज्यावरून नवाब मलिकांनी पत्र लिहून अजित पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. त्याच मलिकांवरून अजित पवार गट आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसतंय. कारण मुंबईतील अजित पवार गटाच्या एका बॅनरवर नवाब मलिकांचा फोटो झळकल्याने चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेला अजित पवार गटाने केराची टोपली दाखवली का? असाही सवाल केला जातोय. अजित पवार यांचा गट भाजप सोबत जाण्याआधी भाजपने मलिकांवर देशद्रोहाचे आरोप केलेत. मात्र गेल्या अधिवेशनात मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्यामुळे भाजपची कोंडी झाली. अखेर जाहीरपणे पत्र लिहित फडणवीसांनी मलिकांना युतीत घेण्यासाठी विरोधही दर्शवला मात्र तरी अजित पवार यांच्या बॅनरवर मलिकांचा फोटो झळकल्याने नवा वाद उफाळून आलाय.

Published on: Jan 08, 2024 11:42 AM
संजय राऊत यांच्या डोक्यात विचित्र…, संजय राऊत यांच्या टीकेवर शंभूराज देसाई यांचा टोला काय?
Talathi Bharti Result | तलाठी भरतीचा निकाल वादात, विद्यार्थ्याला २०० पैकी २१४ गुण? नेमकं प्रकरण काय?