Devendra Fadnavis | जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा : देवेंद्र फडणवीस
एनसीबीने मुंबईच्या समुद्रात एका जहाजात मोठी कारवाई करत ड्रग्स रॅकेट उघडकीस आणलंय. याबाबत आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिलीय. आज एनसीबीने एका क्रुझवर मोठी कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे. त्यात अनेकांना अटक केल्याचंही सांगण्यात आलं आहे. त्यात नेमका कुणाचा समावेश आहे हे मला माहिती नाही. पण जे कुणी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं स्पष्ट मत फडणवीस यांनी व्यक्त केलंय.
एनसीबीने मुंबईच्या समुद्रात एका जहाजात मोठी कारवाई करत ड्रग्स रॅकेट उघडकीस आणलंय. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 8 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. ज्यामध्ये बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचाही समावेश आहे. एनसीबीने समुद्रातून मुंबईतुन गोव्याला जाणाऱ्या क्रोडिलिया या जहाजावर छापा टाकून ही मोठी कारवाई केलीय. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी त्यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केलीय.
एनसीबीने ताब्यात घेतलेल्या 8 जणांची नाव जाहीर केली असून यामध्ये अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासहित 5 पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. दिल्लीतल्या एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून या पार्टीच आयोजन करण्यात आलं होतं. क्रोडिलिया कंपनीकडूनही यासंदर्भात स्पष्टीकरणं देण्यात आलं असून तपासयंत्रणेला सहकार्य करू अस म्हटलंय.
याबाबत आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिलीय. आज एनसीबीने एका क्रुझवर मोठी कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे. त्यात अनेकांना अटक केल्याचंही सांगण्यात आलं आहे. त्यात नेमका कुणाचा समावेश आहे हे मला माहिती नाही. पण जे कुणी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं स्पष्ट मत फडणवीस यांनी व्यक्त केलंय.