मला गोवण्याचा मनसुबा पूर्ण होणार नाही- देवेंद्र फडणवीस

| Updated on: Mar 13, 2022 | 5:31 PM

पोलिसांच्या बदल्यांचा अहवाल लीक झाल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची चौकशी करण्यात आली. तब्बल दोन तास ही चौकशी चालली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

पोलिसांच्या बदल्यांचा अहवाल लीक झाल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची चौकशी करण्यात आली. तब्बल दोन तास ही चौकशी चालली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या प्रकरणाचे सर्व पुरावे केंद्रीय गृहसचिवांना का दिले याची माहितीच त्यांनी मीडियाला दिली. राज्य सरकारने (maharashtra government) हा अहवाल सहा महिने दाबून ठेवला होता. त्यामुळे या प्रकरणाचे पुरावे राज्य सरकारला देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. शिवाय यात आयपीएस अधिकाऱ्यांची नावे होती. त्यामुळे त्यांची ऑथेरिटी असलेल्या केंद्रीय गृहसचिवांकडे (Union Home Secretary) मी हा अहवाल सादर केला, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच मला आरोप किंवी सहआरोपी कसं बनवता येईल या दृष्टीनेच प्रश्न विचारल्या गेल्याचा दावाही फडणवीस यांनी यावेळी केला.

Published on: Mar 13, 2022 05:31 PM
फडणवीसांच्या व्हिडीओ बॉम्बची सीबीआय चौकशी व्हावी- चंद्रकांत पाटील
तेजस मोरेनं फेटाळले प्रविण चव्हाणांचे स्टिंग ऑपरेशनचे आरोप