Loudspeaker Row: मनसेच्या आंदोलनावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मनसेच्या आंदोलनावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. "नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या हनुमान चालिसावरून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा लावणार असेल तर भोंग्याच्या संदर्भात काय भूमिका घेतील, याची आपल्याला कल्पना आली असेल," असं ते म्हणाले.
मनसेच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या हनुमान चालिसावरून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा लावणार असेल तर भोंग्याच्या संदर्भात काय भूमिका घेतील, याची आपल्याला कल्पना आली असेल. पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं पालन करण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण सरकार ती जबाबदारी पार पाडत नसेल तर राजकीय पक्षांना आपापली भूमिका मांडावी लागेल. ती त्यांनी मांडली आहे.’