राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ठाकरे गटाकडून हा…
VIDEO | राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? वेळकाढू धोरणावरच हा आजचा निर्णय.... बघा व्हिडीओ
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर अद्याप निकाल आलेला नाही. येत्या मंगळवारी पुढील सुनावणी होणार असून यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. नबाम राबियाचा जो निर्णय आहे त्या निर्णयावर पुनर्विचार व्हावा म्हणून सत्तासंघर्ष हे प्रकरण सर्वोच्च न्ययालयातील ७ घटनापीठासमोर पाठवा, ही मागणी संयुक्तिक नसल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. हे प्रकरण मेरिटवर ऐकू आणि त्यानंतर अंतिम निर्णय द्यायचा की ७ घटनापीठासमोर हे प्रकरण पाठवायचे हे आम्ही ठरवू. जे आम्हाला वाटत होतं, विशेषतः उद्धव ठाकरे यांची शिवसेना वेळ काढूपणा करण्यात ७ घटनापीठासमोर हे प्रकरण पाठवण्याची मागणी करत असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. वेळकाढू धोरणावरच हा आजचा निर्णय असल्याचा आरोप करत ते म्हणाले वर्षभऱ निकालच लागू नये, मात्र आता नियमित सुनावणी होत असल्याने लवकरच अंतिम निर्णय येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. पण सध्या जो काही निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला त्यावर समाधानी असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.