नखं कापून शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न, राऊतांच्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया
संजय राऊत यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रतित्युत्तर दिले आहे. नखं कापून शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न असतो, अशी प्रतिक्रिया राऊतांच्या आरोपांवर फडणवीसांनी दिली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत भाजप (bjp) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या यांनी INS विक्रांतसाठी कोट्यावधी रुपये जमा केले, मात्र ते राजभवनात पोहोचलेच नाहीत. ते जर पैसे राजभवनात पोहोचले नसतील तर कुठे गेले? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रतित्युत्तर दिले आहे. नखं कापून शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न असतो, अशी प्रतिक्रिया राऊतांच्या आरोपांवर फडणवीसांनी दिली आहे.
Published on: Apr 06, 2022 02:24 PM