अमित शाहांच्या दौऱ्यावरून ठाकरे-फडणवीसांमध्ये वार-पलटवार
अमित शाहांच्या दौऱ्यावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वार-पलटवार पहायला मिळतंय. ठाकरेंकडून काल अमित शाह यांच्यावर टीका करण्यात आली.
अमित शाहांच्या दौऱ्यावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वार-पलटवार पहायला मिळतंय. ठाकरेंकडून काल अमित शाह यांच्यावर टीका करण्यात आली. त्यावर आता ‘सत्ता गेल्यानं ठाकरे नैराश्यापोटी वक्तव्य करत आहेत’ अशी टीका फडणवीसांनी केली. “काल मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती दोन्ही आपण बघितलं. असं म्हणतात की ती मंगलमूर्ती आहे, तिकडे अगोदर काही बोलू नये, पण ते बोलून गेले. गणपतीच्या मंडपातही त्यांना राजकारण दिसतंय, त्याला आपण काही बोलू शकत नाही” असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.