ड्रग्ज प्रकरणी सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात? संजय राऊत यांच्या गंभीर आरोपावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…
शिंदे टोळीतील कुणाचे एल्विश यादव याच्याशी संबंध आहे का? हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं, असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं आहे. संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले...
मुंबई, ४ नोव्हेंबर २०२३ | ड्रग्ज प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत म्हणाले, ‘एल्विश यादवला वर्षावर घेऊन येणार खासदार ड्रग्ज सेवन करतो’, तर ड्रग्ज प्रकरणाची सूत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यात आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. शिंदे टोळीतील कुणाचे एल्विश यादवशी संबंध आहे का? हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं, असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं आहे. यावर त्यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ठाकरे गटाते वैफल्यग्रस्त नेते एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करताय. ज्यावेळी एल्विश यादव हा मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी आला तेव्हा त्यांच्यावर कोणतेही आरोप नव्हते तेव्हा तो फक्त सेलिब्रिटी म्हणून आला. त्यामुळे आता त्यांच्यावर आरोप आहेत तर असं वक्तव्य काही लोकं मुख्यमंत्र्यांवर आरोप करताय, हे धंदे वैफल्यग्रस्त उबाठाचे नेते करताय.