Devendra Fadnavis : योग्य निर्णय आमच्या बाजूने येईल, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, अधिक बोलणं टाळलं
'कोर्टाच्या पुढील सुनावणीपर्यंत आता महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तार लांबणार का, यावर ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम म्हणाले की, कायद्याने आणि राज्य घटनेने मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याला कुठेही हरकत घेतलेली नाही.'
मुंबईः आज सुप्रीम कोर्टात (Supreme court) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईसंबंधी याचिकेवर सुनावणी झाली. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही गटाच्या वकिलांनी आज कोर्टात युक्तिवाद केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईसंबंधी याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात (Supreme court) सुनावणी झाली. याप्रकरणाची सुनावणी येत्या 01 ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणार का, असा प्रश्न संपूर्ण राज्याला पडला आहे. कारण ज्या आमदारांच्या अपात्रतेसंबंधीची केस आहे, त्यात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्र्यांचा शपथविधीच बेकायदेशीर आहे, त्यामुळे पुढे मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही, असा प्रश्न विचारला जातोय. दरम्यान, यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.