देशासमोरील सर्व प्रश्नांची उत्तरं संविधानामध्ये मिळतात: देवेंद्र फडणवीस
देशासमोरील सर्व प्रश्नांचं उत्तर संविधानात आहे. संविधानात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यामुळं देश एक आहे. संधीची समानता या मुळं कोणी मागं राहणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. संविधानाच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीला न्याय देता येईल, असं फडणवीस म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान समितीत दिलेलं जे भाषण आहे ते आजही द्यावं अशी आज परिस्थिती आहे. संकुचित वृत्ती सोडून आपण एका मार्गानं चालण्याचा विचार केला तर आपण हा देश महान बनवू शकतो. आज देश त्या मार्गानं चाललेला आहे. मात्र, काही व्यक्ती संकुचित त्या मार्गावरुन देशाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर चालून येत्या 10 वर्षात जगातील विकसित देश म्हणून विकसित करु शकतो. देशासमोरील सर्व प्रश्नांचं उत्तर संविधानात आहे. संविधानात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यामुळं देश एक आहे. संधीची समानता या मुळं कोणी मागं राहणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. संविधानाच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीला न्याय देता येईल, असं फडणवीस म्हणाले.