आमचे सर्व उमेदवार विजयी होतील, फडणवीसांना विश्वास; जाणून घ्या दिवसभरातील मोठ्या घडामोडी
पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी उद्या होणार मतदान, ५ मतदार संघातील निवडणुकीकडे राज्यातील जनतेचं लक्ष
आमचे सर्व उमेदवार शिक्षक पदवीधर निवडणुकीत विजयी होतील, अशी प्रतिक्रिया शिक्षक पदवीधर निवडणुकीवर देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार असून ५ मतदार संघातील निवडणुकीकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागले आहे. सत्यजित तांबे यांना भाजपकडून अद्याप अधिकृत कोणताही पाठिंबा जाहीर झालेला नाही. असे असले तरी सत्यजित तांबे यांनी निवडून आणण्यासाठी कामाला लागा, पक्ष श्रेष्ठींनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत.
मुंबईत उद्या आणि परवा दोन दिवस पाणीकपात राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, असे आवाहन पालिकेकडून नागरिकांना करण्यात येत आहे. दुरूस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
मुंबईत आज तीन मोठे मोर्चे धडकणार आहेत. मुंबईत आज शिवाजी पार्क आणि चेंबूर अशा दोन ठिकाणी धर्मांतर विरोधी कायदा आणि लव्ह जिहाद विरोधी कायदा राज्यात अस्तित्वात यावा, अशी मागणी घेऊन हिंदू जनआक्रोश मोर्चा धडकणार आहे. तर दुसरीकडे मुंबईतील आझाद मैदानावर लिंगायत समाजाचा देखील महामोर्चा असणार आहे.