Devendra Fadnavis | अनिल देशमुखांवरील कारवाई कोर्टाच्या आदेशानुसार, यात राजकीय हेतू नाही : फडणवीस
अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरु असलेली कारवाई ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच सुरु आहे. या कारवाईचा कुठलाही राजकीय अन्वयार्थ काढण्याची गरज नाही, असंही फडणवीस म्हणाले.
नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी सकाळपासूनच ईडीची छापेमारी सुरु आहे. त्याचबरोबर देशमुख यांचे खासगी सचिव संजिव पालांडे यांनाही ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या कारवाईवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि केंद्र सरकावर जोरदार टीका केलीय. राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्या टीकेला आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच सुरु असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.
अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरु असलेली कारवाई ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच सुरु आहे. या कारवाईचा कुठलाही राजकीय अन्वयार्थ काढण्याची गरज नाही, असंही फडणवीस म्हणाले. न्यायालयाने सोपवलेल्या जबाबदारीनुसारच केंद्रीय तपास यंत्रणा आपलं काम करत आहेत.