Devendra Fadnavis | चंद्रशेखर बावनकुळेंच्या विजयानं महाविकास आघाडी सरकारला चपराक दिली : फडणवीस

| Updated on: Dec 14, 2021 | 12:45 PM

हा निर्णायक विजय असून महाविकास आघाडीला चपराक आणि भविष्यातील विजयाच्या मालिकेची सुरुवात असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

हा निर्णायक विजय असून महाविकास आघाडीला चपराक आणि भविष्यातील विजयाच्या मालिकेची सुरुवात असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. आज मला अतिशय आनंद आहे की माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रचंड मोठा विजय मिळाला आहे. मी स्वत: निवडून आलो तेव्हा झालेल्या आनंदापेक्षा मोठा आनंद झाला आहे. महाविकास आघाडीला ही चपराक आहे. अकोल्यात वसंत खंडेलवाल यांनी निर्णायक विजय मिळवला आहे. महाविकास आघाडी एकत्र आल्यावर सगळ्या प्रकारचा विजय होऊ शकतो, हे मांडलेले गणित चुकीचं आहे, हे या निकालामुळं स्पष्ट झालं आहे. बावनकुळे यांचा विजय ही भविष्यातील यशाची नांदी आहे. नरेंद्र मोदी, जे पी नड्डा, नितीन गडकरी यांचं आभार मानतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. हा निर्णायक विजय असून भविष्यातील विजयाच्या मालिकेची सुरुवात आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Sanjay Raut | बहुसंख्य हिंदूंच्या भावना डावलून राजकीय पाऊल टाकता येणार नाही : संजय राऊत
Nagpur Election | नागपूर विधानपरिषदेत भाजपचा दणदणीत विजय, फडणवीसांची गळाभेट घेत बावनकुळे भावूक