‘त्यांची’ दुकानं बंद होऊ नये म्हणून इंडिया आघाडी, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला विरोधकांचा अजेंडा

| Updated on: Dec 19, 2023 | 7:29 PM

परिवारवादी पक्षांची दुकानं बंद होणार म्हणून विरोध एकत्र आल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तर देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत देशाची लोकशाही हाच आमचा स्वार्थ असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले

मुंबई, १९ डिसेंबर २०२३ : परिवारवादी पक्षांची दुकानं बंद होणार म्हणून विरोध एकत्र आल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तर देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत देशाची लोकशाही हाच आमचा स्वार्थ असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तर देशाचा विकास व्हावा म्हणून हे एकत्र आले नाही तर फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवण्याचा विरोधकांचा अजेंडा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तर पतंप्रधान मोदी यांना हरवलं नाही तर आपल्या परिवादी पक्षांची दुकानं बंद होणार त्याला कुलपं लागणार आणि त्याच दुकानांना कुलपं लागू नये, म्हणून इंडिया आघाडी तयार करून हे सगळे एकत्र आले असल्याचा खोचक टोलाही फडणवीस यांनी इंडिया आघाडीला लगावला आहे.

Published on: Dec 19, 2023 07:25 PM
आम्ही नालायक शेतकरी म्हणत कांद्याचं FREE मध्ये वाटप, कांद्याचे दर पडल्याने बळीराजा संतप्त
शिवसेना अपात्रतेच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? अनिल देसाई यांनी सविस्तर सांगितलं…