भाजपला मातीत गाडण्याची भाषा करणारेच गाडले गेले, मुंडेच्या वक्तव्याचा फडणवीसांकडून समाचार
भाजपला मातीत गाडा, असं विधान सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. मुंडे यांच्या या विधाना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे.
भाजपला मातीत गाडा, असं विधान सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. मुंडे यांच्या या विधाना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे. अरे वेड्या, भाजप महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष आहे. आम्हाला गाडण्याची भाषा करू नका. दोनचार खासदार असणाऱ्या पक्षाच्या मंत्र्याने अशी भाषा वापरू नये, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. अक्कलकोट येथे फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचे आज भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते. एककिडे शेतकरी आत्महत्या करतोय, एसटीचे कामगार संप करत आहेत. मात्र दुसरीकडे हे मंत्री नाचगाण्याचे कार्यक्रम करत आहेत, अशी टीका करतानाच अरे वेड्या, भाजप हा महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष आहे. आम्हाला गाडण्याची भाषा करू नका. आमचा एक कार्यकर्ता तुमच्यासाठी पुष्कळ आहे, असा इशारा फडणवीस यांनी दिला.