Devendra Fadnavis | वेश्यांच्या पैशांवर सत्ताधाऱ्यांचा डल्ला

| Updated on: Apr 04, 2022 | 5:44 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या आधी कोरोना (corona) काळात भ्रष्टाचार झाल्याचं सांगून सरकारला घेरलं होतं. आता त्यांनी कोरोना काळातील आणखी एका भ्रष्टाचारावरून सरकारला घेरलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या आधी कोरोना (corona) काळात भ्रष्टाचार झाल्याचं सांगून सरकारला घेरलं होतं. आता त्यांनी कोरोना काळातील आणखी एका भ्रष्टाचारावरून सरकारला घेरलं आहे. कोरोना काळात वेश्यांना देण्यात येणारे पैसे या लोकांनी आपल्या नातेवाईंकाना दिले आहेत. वेश्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांना काय म्हणतात हे सर्वांना माहीत आहे. संजय राऊत (sanjay raut) तो शब्द नेहमी वापरत असतात. असे काही लोक या सरकारमध्ये आहेत, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सत्तापक्षाचे नेते धान खरेदी केंद्रांचे मालक होत आहेत. आमच्या शेतकऱ्यांना धानाचा बोनस हे सरकार देत नाही, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला. गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला केला. तसेच हे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा दावाही त्यांनी केला.

Published on: Apr 04, 2022 05:32 PM
Dilip Walse Patil : अजान सुरू झाले अन् गृहमंत्र्यांनी भाषण थांबवले
हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा : Kirit Somaiya