रिफायनरीला विरोध कुणी केला?; 5 लाख रोजगार, साडे तीन लाख कोटींची गुंतवणूक कोणी घालवली?; फडणवीसांचा शिवसेनेला सवाल
गुजरातच्या अर्थव्यवस्थेला बघितलं तर त्यात दोनच गोष्टीचा वाटा आहे. पहिला वाटा जामनगरच्या रिफायनरीचा आणि दुसरा वाटा आहे मुंद्रा पोर्टचा. या जामनगरच्या रिफायनरीपेक्षा चारपट रिफायनरी तयार झाली असती तर महाराष्ट्र पुढचे दहा वर्ष पुढे गेला असता. पण त्या रिफायनरीला विरोध केला.
मुंबई: देशातील सर्वात मोठी रिफायनरी (refinery project) महाराष्ट्रात येणार होती. 3 लाख 50 कोटी गुंतवणूक म्हणजे देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक राज्यात होणार होती. सर्व शासकीय ऑईल कंपन्या आणि पार्टनर म्हणून मिडल ईस्टची कंपनी ही रिफायनरी उभारणार होते. या गुंतवणुकीने 5 लाख लोकांना आपण रोजगार देऊ शकलो. गुजरातच्या अर्थव्यवस्थेला बघितलं तर त्यात दोनच गोष्टीचा वाटा आहे. पहिला वाटा जामनगरच्या रिफायनरीचा आणि दुसरा वाटा आहे मुंद्रा पोर्टचा. या जामनगरच्या रिफायनरीपेक्षा चारपट रिफायनरी तयार झाली असती तर महाराष्ट्र पुढचे दहा वर्ष पुढे गेला असता. पण त्या रिफायनरीला विरोध केला. ती होऊ दिली नाही. आजही आम्ही ती करणार आहोत. आता ती स्केल डाऊन झाली. ती साडे तीन लाख कोटीची राहिली नाही. आपली एवढी मोठी गुंतवणूक घालवली, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी शिवसेनेवर (shivsena) केली. वेदांता प्रकल्पावरून राज्य सरकारवर टीका होत असतानाच फडणवीस यांनी रिफायनरीवरून सरकारला धारेवर धरलं.