राहुल गांधींची ट्रेन कशी? त्याला फक्त इंजिन अन् डब्बे नाहीच; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

| Updated on: Apr 14, 2024 | 9:40 PM

महायुतीचे भंडारा-गोंदियाचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा आज भंडाऱ्यात पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीसही हजर होते. त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा चांगलाच समाचार घेतला

महायुतीचे भंडारा-गोंदियाचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा आज भंडाऱ्यात पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीसही हजर होते. त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा चांगलाच समाचार घेतला. “आमच्या महायुतीचं इंजिन नरेंद्र मोदी आहेत. आमच्या सर्वांचे डब्बे त्याला लागलेले असून ही विकासाची ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये बसण्यासाठी प्रत्येकाला जागा आहे. दीन, दलित, गोर-गरीब, आदिवासी, शेतकरी, शेजमजूर, अल्पसंख्याक, प्रत्येकाला बसवून मोदींच्या नेतृत्वात ही विकासाची ट्रेन पुढे जात आहे. पण राहुल गांधींची ट्रेन कशी आहे? त्या ठिकाणी डब्बेच नाहीत. इंजिनमध्ये कुणाला बसण्याची संधी असते का? इंजिनमध्ये केवळ ड्रायव्हर बसतो. तिथे इंजिनही नाही. नरेंद्र मोदींच्या विकासाच्या गाडीमध्ये बसून आपल्याला पुढे जायचं आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Published on: Apr 14, 2024 09:40 PM