बाल लैंगिक गुन्ह्यासह महिला बेपत्ता होण्यात महाराष्ट्राचा नंबर कितवा? विधान परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी थेट आकडा सांगितला…

| Updated on: Aug 04, 2023 | 2:39 PM

VIDEO | 'राज्याच्या 'ऑपरेशन मुस्कान' च्या कामगिरीचं केंद्राकडून कौतुक करत महिला बेपत्ता होण्यासह बाल लैंगिक गुन्ह्यात महाराष्ट्र कितवा?; देवेंद्र फडणवीस यांनी कायदा-सुव्यवस्थेवर बोलताना थेट उत्तर दिलं

मुंबई, ४ ऑगस्ट २०२३ | विधान परिषदेत राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा करण्यात आली. यावेळी ज्यातून महिला गायब होण्याचं प्रमाण आणि बाल लैंगिक गुन्हा या मुद्याचे विधान परिषदेत पडसाद उमटले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यांवर बोलताना महिला बेपत्ता होण्यात आणि बाल लैंगिक गुन्ह्यात महाराष्ट्र कितव्या नंबरवर आहे, याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली. सर्वोच्च न्यायालयाने महिला आणि लहान मुले बेपत्ता होत असल्याने काही निर्बंध टाकले आहेत. महिला किंवा मुले गायब झाल्यास 72 तासांत तो एफआयआर करावा लागतो. त्यांना किडनॅप केले किंवा पळवून नेले या दृष्टीने तपास करावा लागतो. त्यातही महाराष्ट्र 12व्या क्रमांकावर आहे.

बाल लैंगिक गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र 17वा आहे, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. दरम्यान, महिला बेपत्ता होण्याच्या प्रकरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत 5 हजार 493 गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे, इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत मुंबई ही वर्षानुवर्षे महिलांना सुरक्षित वाटते. मुंबईत महिला रात्रीही प्रवास करतात. हे महत्त्वाचे आहे. आपण अनेकवेळा संख्या किंवा आकडे सांगतो. पण महाराष्ट्र गुन्ह्यात तिसरा आहे. विशेष म्हणजे लोकसंख्येत महाराष्ट्र मोठा आहे. दर एक लाख लोकसंख्येमागे गुन्हे किती हे पाहावे. दर लाख गुन्ह्यांमध्ये 294.3 टक्के इतके आहे. गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात दहावा आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Published on: Aug 04, 2023 02:38 PM
“प्रदीप कुरुलकरवर देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करत नाही?”; संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल़
रस्ता कुठे? खड्डा कुठे? मुंबई-गोवा महामार्ग बनला खड्डे मार्ग; प्रशासनाचे दुर्लक्ष!