2024 ला फडणवीस मुख्यमंत्री म्हणून वानखेडेवर शपथ घेणार? चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Dec 05, 2023 | 12:11 PM

चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असे सांगत त्या शपथ विधीचं ठिकाण सुद्धा घोषित केले आहे. २०१४ ला मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर झालेला देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी २०२४ लाही होणार असा हुंकार भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी भरलाय

मुंबई, ५ डिसेंबर २०२३ : मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या ठिकाणी शानदार विजय मिळवल्यानंतर भाजपने आता महाराष्ट्राकडे आपलं लक्ष केंद्रित केले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असे सांगत त्या शपथ विधीचं ठिकाण सुद्धा घोषित केले आहे. २०१४ ला मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर झालेला देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी २०२४ लाही होणार असा हुंकार भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी भरलाय. भंडाऱ्यातील लाखनी येथे कार्यकर्त्यांच्या संपर्क मेळाव्यात कार्यकर्त्यांकडून बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव वधवून घेतलंय. नुकतेच पाच राज्याचे निकाल लागलेत. ज्यामध्ये ३ राज्यात भाजपने दणक्यात विजय मिळवलाय. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बावनकुळे यांनी महाराष्ट्रात पुढचे मुख्यमंत्री फडणवीस असतील असं म्हणत शपथ विधीचं ठिकाणही घोषित केलंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Dec 05, 2023 12:11 PM
भाजप सुसाट, आत्मविश्वास दमदार; 2024 ची लढाई, इंडिया आघाडीची किती तयारी? मोदी म्हणाले…
आधी दोघाचं लग्न झालेलं पण आता…, महायुती सरकारवर संजय राऊत यांचा हल्लाबोल