मोदींचा फोटो लावून जिंकायचे पण आता कळेल….देवेंद्र फडणवीस याचं उद्धव ठाकरे यांना आव्हान

| Updated on: Feb 23, 2024 | 1:50 PM

मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांसाठी भाजपनं कंबर कसली... आतापर्यंत मोदींचा फोटो लावून जिंकले पण आता कळेल असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना इशाराही दिला. भाजपने आपला मोर्चा मुंबईकडे वळवलाय. मुंबईच्या सहाही जागा जिंकण्यासाठी भाजपनं आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे.

मुंबई, २३ फेब्रुवारी २०२४ : मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांसाठी भाजपनं कंबर कसली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यात भाजपची रणनिती ठरली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी या लोकसभा निवडणुकीत मुंबईकर कुणासोबत आहे हे कळेल, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांना भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यातून आव्हान दिलंय. तर आतापर्यंत मोदींचा फोटो लावून जिंकले पण आता कळेल असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना इशाराही दिला. भाजपने आपला मोर्चा मुंबईकडे वळवलाय. मुंबईच्या सहाही जागा जिंकण्यासाठी भाजपनं आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. जे पी नड्डा दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी नड्डांसह मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यासह बैठक झाली. मुंबईत लोकसभेच्या सहा जागा असून भाजपने सहा मोठे कार्यक्रम आखलेत. त्यावरून भाजपने मुंबईकडे खास लक्ष दिल्याचे सहज लक्षात येते. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Feb 23, 2024 01:50 PM
बीड लोकसभा कोण लढवणार? यंदा भाजपचा उमेदवार बदलणार? प्रीतम मुंडे की पंकजा मुंडे निवडणुकीच्या मैदानात उतरणार?
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं वयाच्या ५९ व्या वर्षी निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास