Rane-Fadnavis Meet | देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या भटीला
भाजप नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली आहे. नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच नारायण राणे यांची भेट घेतली आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली आहे. नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच नारायण राणे यांची भेट घेतली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना 12 केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. रवीशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांनीही राजीनामे दिले होते. त्यामुळे अनेक समित्यातील पदे रिक्त झाली होती. त्यामध्ये नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. इन्व्हेन्सटमेंट अँड ग्रोथ कमिटीमध्ये नारायण राणे, ज्योतिरादित्य सिंधिया, अश्विनी वैष्णव यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करत असते. तर रोजगार आणि स्किलशी संबंधित कमिटीमध्ये धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव, हरदीप पुरी, आरसीपी सिंह यांचा समावेश करण्यात आला आहे. या कमिटीचे अध्यक्षपदही पंतप्रधानांकडे आहे.