Sanjay Raut :..तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, संजय राऊत नेमकं काय म्हणालेत?

| Updated on: Jun 12, 2022 | 11:22 AM

शिवसेनेचे संजय पवार यांचा धक्कादायक पराभव झाला. तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार धनंजय महाडिकांचा विजय झालेत.

मुंबई: दोन दिवस आमच्या हातात ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, असा हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे. राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) शिवसेनेचे संजय पवार (sanjay pawar) यांचा धक्कादायक पराभव झाला. तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार धनंजय महाडिकांचा विजय झालेय. यात आता भाजपला राज्यसभा निवडणुकीत अपक्षांना फोडण्यात भाजपला यश आलंय. तर दुसरीकडे शिवसेनेचे शिवसेनेचे संजय पवार हे पराभूत झाले आहेत. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याचवर बोलताना राऊत यांनी फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘अपक्ष आमदारांबाबत काही बोलायचं नाही. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांचा अपमान करायचा नव्हता, असं सांगतानाच दोन दिवस आमच्या हातात ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, असं राऊत म्हणालेत.

 

 

Published on: Jun 12, 2022 11:22 AM
मी नाराजी उघडपणे व्यक्त केली, राज्यसभेचं पराभवाचं खापर माझ्यासह अपक्ष आमदारांवर फोडलं जातंय – देवेंद्र भुयार
Sanjay Raut : पंकजा मुंडेंना एकटे पाडायचं हे भाजपचं धोरण, संजय राऊतांनी पुन्हा भाजपला डिवचलं