देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, दिल्लीच्या बैठकीत शिक्कामोर्तब तर एकनाथ शिंदेंच्या वाट्याला काय?

| Updated on: Nov 29, 2024 | 12:01 PM

केंद्रीय नेतृत्वाने राज्याचे मुख्यमंत्रिपदासंदर्भात निर्णय घेतला असून कोणत्याही क्षणी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री म्हणून होण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे यांनी गृहखात्यासह १२ मंत्रिपद द्या, अशी मागणी महायुतीच्या बैठकीत केली आहे. केंद्रीय नेतृत्वाकडे शिंदेंनी केलेल्या या मागणीनंतर गृहखातं भाजप त्यांच्याकडे देणार की नाही?

राजधानी दिल्लीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या घरी काल अडीच तास बैठक झाली. दिल्लीत झालेल्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळतेय. केंद्रीय नेतृत्वाने राज्याचे मुख्यमंत्रिपदासंदर्भात निर्णय घेतला असून कोणत्याही क्षणी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री म्हणून होण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे यांनी गृहखात्यासह १२ मंत्रिपद द्या, अशी मागणी महायुतीच्या बैठकीत केली आहे. केंद्रीय नेतृत्वाकडे शिंदेंनी केलेल्या या मागणीनंतर गृहखातं भाजप त्यांच्याकडे देणार की नाही? याबाबत अद्याप शाशंकता आहे. त्यामुळे गृहमंत्रिपदावरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, केंद्रीय नेतृत्वाकडून एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर देण्यात आल्या आहेत. यामध्ये राज्यात उपमुख्यमंत्री नाहीतर केंद्रात चांगलं खातं देऊ, अशी भाजपने तयारी दर्शविली होती. मात्र काल रात्रीच्या एका बैठकीत एकनाथ शिंदेंनी खासदारांची मतं जाणून घेतली. यावेळी केंद्रात नाहीतर राज्यात तुमची गरज आहे, असा सूर शिवसेनेच्या नेत्यांचा आहे. त्यामुळे केंद्रात येण्यावर नाही असी शक्यता दिसते.

Published on: Nov 29, 2024 12:01 PM
मुख्यमंत्री फडणवीसच? दिल्लीत फैसला पण शंभूराज देसाई अन् चंद्रकांत दादांचा सूर वेगळा?
दिल्लीच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले; ‘मी काळजीवाहू मुख्यमंत्री, सगळ्यांची काळजी घेतोय, आजही खूश…’