2024 मध्ये मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे? भाजप आमदाराचा मोठा दावा काय?
VIDEO | आगामी विधानसभा निवडणुकी 2023 मध्ये मुख्यमंत्रीपदाचे दावेदार कोण? फडणवीस की शिंदे? यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना भाजप आमदाराचा मोठा दावा काय?
मुंबई, २३ सप्टेंबर २०२३ | आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्रीपदाचे दावेदार कोण असणार यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बऱ्याचदा असे म्हटले होते की, आगामी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील. दरम्यान भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केले आहे. आज टीव्ही ९ मराठीशी बोलताना प्रसाद लाड यांनी मोठा दावा केला आहे. लाड म्हणाले, निश्चितपणे यात काही शंका नाहीय. बाप्पाने निश्चितच केलंय. 2024 नाही, तर 2034 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार या देशात राहील. राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात पुन्हा एकदा सरकार स्थापन होईल आणि देवेंद्र फडणवीस आमचे मुख्यमंत्री होतील आणि 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य प्रसाद लाड यांनी केले आहे.