देवेंद्र फडणवीसांच्या नावे शपथविधीसह अनेक रेकॉर्ड, राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ

| Updated on: Dec 05, 2024 | 11:19 AM

१९६० पासून ते आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात जो कोणी उपमुख्यमंत्री झाला तो मुख्यमंत्री न झाल्याची उदाहरणं आहेत. उपमुख्यमंत्रिपदावर राहून मुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पहिलेच नेते ठरणार आहेत.

राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे आज संध्याकाळी मुंबईतील आझाद मैदानावर शपथ घेणार आहेत. या शपथविधीसह
देवेंद्र फडणवीस यांच्या नावे अनेक रेकॉर्ड होणार आहेत. आजवर महाराष्ट्राचा कोणताच उपमुख्यमंत्री हा मुख्यमंत्री झाला नव्हता. तो पायंडा देवेंद्र फडणवीस मोडीत काढणार आहेत. तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन फडणवीस नवा रेकॉर्ड करणार आहेत. १९६० पासून ते आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात जो कोणी उपमुख्यमंत्री झाला तो मुख्यमंत्री न झाल्याची उदाहरणं आहेत. उपमुख्यमंत्रिपदावर राहून मुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पहिलेच नेते ठरणार आहेत. आतापर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्राला एकूण ११ उपमुख्यमंत्री लाभले. ज्यामध्ये २ वेळा छगन भुजबळ तर ५ वेळा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद भुषवलं. नाशिकराव तिरपडे, सुंदरराव सोळंखे, रामराव आदिक, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते, आर.आर पाटील, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री राहिलेत. तर उपमुख्यमंत्रिपदानंतर मुख्यमंत्री होणारे फडणवीस हे पहिलेच नेते आहेत. १९७८ पासून महाराष्ट्रात हा समज होता की, उपमुख्यमंत्री झालेला व्यक्ती हा मुख्यमंत्री होत नाही. तो पायंडा फडणवीसांनी मोडला. तर वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षांची टर्म पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री आहेत.

Published on: Dec 05, 2024 11:19 AM
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की…’, आझाद मैदानावर आज भव्य शपथविधी सोहळा
Ajit Pawar : अजित पवार सहाव्यांदा घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ; सर्वाधिक वेळा DCM होणारे ‘दादा’ एकमेव