Devendra Fadnavis | टाडाकडून जप्ती येऊ नये यासाठी जमिनीचा व्यवहार का केला?
देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांवर खळबळजनक आरोप केले आहेत. नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन खरेदी करण्यात आल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.माय मराठीची क्षमा मागून आजच्या पत्रकार परिषदेची सुरुवात राष्ट्रभाषेत करणार आहोत. मी एक घोषणा केली होती दिवाळीनंतर काही गोष्टी समोर आणणार आहे. उशीर झाला, काही लोकांच्या पत्रकार परिषद सुरु होत्या. मी जे सांगणार आहे ती सलीम जावेद यांची कथा नाही. तो इंटरवल नंतरचा चित्रपट नाही. हा एक देशाच्या सुरक्षेबद्दलचा प्रश्न आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांवर खळबळजनक आरोप केले आहेत. नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन खरेदी करण्यात आल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
सरदार शहावली खान आणि सलीम पटेल कोण?
सरदार शहाबली खान हा 1993 चे गुन्हेगार आहेत. त्यांना जन्मठेप झाली आहे ते तुरुंगात आहेत. त्यांची शिक्षा सुप्रीम कोर्टानं कायम केली आहे. सरदार शहाबली खान याच्यावर टायगर मेमन याच्या नेतृत्त्वात मुंबई महापालिका आणि बॉम्बे स्टॉक एक्सेंजमध्ये बॉम्ब ठेवण्यासंदर्भात चर्चा झाली होती. टायगर मेमनच्या घरी बैठक झाली होती. टायगर मेमनच्या गाडीत आरडीएक्स भरलं गेलं त्यामध्ये सरदार शहाबली खानचा समावेश होता. सरकारी साक्षीदारांनतर त्यांना शिक्षा भोगावी लागत आहे.