VIDEO : Devendra Fadnavis | वासरु मारलं तर गाय मारण्याची सरकारची भूमिका अयोग्य – देवेंद्र फडणवीस
वासरु मारलं तर गाय मारण्याची सरकारची भूमिका अयोग्य आहे. भारतीय जनता पक्ष राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नसेल, पण पक्ष संपूर्णपणे, पूर्ण ताकदीने नारायण राणे यांच्यासोबत आहे, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
वासरु मारलं तर गाय मारण्याची सरकारची भूमिका अयोग्य आहे. भारतीय जनता पक्ष राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नसेल, पण पक्ष संपूर्णपणे, पूर्ण ताकदीने नारायण राणे यांच्यासोबत आहे, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या वाक्याने मोठा वाद निर्माण झालाय. मुळात राणे साहेब बोलण्याच्या ओघात हे झालं असावं. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.