VIDEO : Devendra Fadnavis | 2024 ला आमचं एकच इंजिन असणार, मनसेबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
देवेंद्र फडणवीस आज पुण्यात आहेत. त्यांनी पुण्यातील मेट्रो कामाची पाहणी केली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं. मनसे आणि भाजप एकत्र येणार आहे का? असा सवाल फडणवीसांना करण्यात आला.
देवेंद्र फडणवीस आज पुण्यात आहेत. त्यांनी पुण्यातील मेट्रो कामाची पाहणी केली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं. मनसे आणि भाजप एकत्र येणार आहे का? असा सवाल फडणवीसांना करण्यात आला. त्यावर 2024मध्ये भाजपचं एकच इंजिन असेल एवढं ध्यानात ठेवा, असं फडणवीस म्हणाले. त्यामुळे मनसे-भाजप युती होणार नसल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी फडणवीस यांनी दिल्लीत जाणार असल्याचंही सांगितलं. दिल्लीत भाजपची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी चंद्रकांत पाटील दिल्लीत गेले आहेत. तर पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार हे भाजप नेते सोमवारी दिल्लीत जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या या दिल्लीवारीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.