Special Report | काँग्रेसच्या धुसफुसीत देवेंद्र फडणवीस यांनी तेल ओतलं?
काँग्रेसच्या दुखऱ्या नशीवर देवेंद्र फडणवीस यांनी बोट ठेवलं. निधी वाटप आणि अर्थसंकल्पातील तरतुदींमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यांना अधिक निधी दिल्याचा दावा करण्यात येत होता.
काँग्रेसच्या दुखऱ्या नशीवर देवेंद्र फडणवीस यांनी बोट ठेवलं. निधी वाटप आणि अर्थसंकल्पातील तरतुदींमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यांना अधिक निधी दिल्याचा दावा करण्यात येत होता. देवेंद्र फडणवीस यांनी आज यांसदर्भातील आकडेवारी सविस्तर मांडली त्यावेळी काँग्रेस नेत्यांना हसू आवरत नव्हतं. तर, शिवसेनेचे नेते भास्कर जाधव तालिका अध्यक्ष म्हणून काम करत होते. तिथं बसून त्यांना हसू आवरत नव्हतं. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला, असं म्हटलं. या अर्थसंकल्पाचं आकारमान 5 लाख 48 हजार 747 कोटी इतकं आहे. त्यापैकी राष्ट्रवादीच्या खात्यांना 3 लाख 14 हजार 820 म्हणजे 57 टक्के निधी देण्यात आला. काँग्रेसच्या खात्यांना 1 लाख 44 हजार 193 कोटी देण्यात आले. म्हणजे 26 टक्के निधी दिला गेला. शिवसेनेला 90 हजार 181 कोटी म्हणजे 16 टक्के निधी दिला गेला. आशिष शेलार देखील यावरुन शिवसेनेला डिवचण्याचं काम करत होते.