महाराष्ट्रात तानाशाही सरकार, अधिवेशनात विविध मुद्द्यांवर चर्चा करा- फडणवीस
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. आघाडी सरकारमधील महत्त्वाचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांना अटक झाल्याने या अधिवेशनाकडे अधिक लक्ष लागलं आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची (bjp) भूमिका आणि रोख स्पष्ट केला आहे. फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड, नवाब […]
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. आघाडी सरकारमधील महत्त्वाचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांना अटक झाल्याने या अधिवेशनाकडे अधिक लक्ष लागलं आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची (bjp) भूमिका आणि रोख स्पष्ट केला आहे. फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड, नवाब मलिक यांची अटक ते त्यांचे दाऊदशी असलेले संबंध यावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तसेच एसटी कामगारांच्या मागण्यांवरूनही ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. तसंच “महाराष्ट्रात तानाशाही सरकार आहे. अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा व्हावी”, असं फडणवीस म्हणाले आहेत.