माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या पतीचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

| Updated on: Feb 24, 2023 | 12:00 PM

देविसिंह शेखावत यांच्या निधनावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त

पुणे : माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचं पुण्यात निधन झालं आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात वयाच्या 89व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी प्रतिभा पाटील आणि एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. देविसिंह शेखावत यांच्या निधनावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहेत. माजी आमदार देविसिंह शेखावत यांचं आज सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी दु:खद निधन झालं. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने दोन दिवसांपूर्वीच येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र वयोमानामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली होती. ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आज संध्याकाली 6 वाजता पुण्यातच त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

Published on: Feb 24, 2023 11:58 AM
वारूडमधील १६ हजार कृषीपंपाची वीज कापणार, यासह बघा महत्वाच्या २५ बातम्या
श्रद्धांजली वाहण्याचं कसलं ढोंग करता, भाजप नेत्याची उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका