अयोध्येतील हनुमानगढी इथं हनुमान जयंतीनिमित्त भक्तांची रिघ, तुम्हीही घ्या दर्शन

| Updated on: Apr 06, 2023 | 10:56 PM

VIDEO | हनुमान जयंती साजरी करण्यासाठी देशभऱातील लोक अयोध्येतील हनुमानगढी येथे मोठ्या संख्येने दाखल होत असतात. यंदाही भाविकांची मोठी गर्दी

अयोध्या : देशभरात आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्ताने अयोध्येतील हनुमानगढी येथे हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. हनुमान जयंती साजरी करण्यासाठी देशभऱातील लोक अयोध्येतील हनुमानगढी येथे मोठ्या संख्येने दाखल होत असतात. यंदाही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी भाविकांना जयश्री राम आणि जय हनुमान असा जयघोषही केल्याचे पाहायला मिळाले. अयोध्येतील हनुमानगढी हे प्राचीन आणि प्रसिद्ध हनुमान मंदिर असल्याने अयोध्येसह देशभरातील भाविक याठिकाणी आवर्जून दाखल होत असतात. दरम्यान, हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर भक्तांनी मोठी गर्दी केली तर यावेळी पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी देखभाल करत सर्व भक्तांना दर्शनाची योग्य व्यवस्था देखील करून दिल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Apr 06, 2023 10:49 PM
अन् यापुढे उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर शुद्धीकरण! नवनीत राणा पुन्हा एकदा बरसल्या
जो भ्रष्टाचार केलात तो पक्ष म्हणून केलात की टोळी म्हणून; शिंदे गटाच्या नेत्याचा ठाकरेंना प्रश्न