विठ्ठल मंदिरात 21 प्रकारच्या 2 टन फळांची सजावट, पुण्यातील भाविकानं घेतला पुढाकार

| Updated on: Apr 02, 2022 | 10:19 AM

भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार, वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होते. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. राज्य सध्या निर्बधमुक्त असल्याने चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर साजरा होणारा गुढीपाडवा यंदा सर्वत्र जल्लोषात साजरा होणार आहे.

भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार, वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होते. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. राज्य सध्या निर्बधमुक्त असल्याने चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर साजरा होणारा गुढीपाडवा यंदा सर्वत्र जल्लोषात साजरा होणार आहे. गुढीपाडवाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्तवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वेगवेगळ्या 21 प्रकारच्या दोन टन फळा फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. ही सजावट पुणे येथील श्री विठ्ठल भक्त अशोक मोरे यांनी केली आहे.यामध्ये श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा , सभामंडप, चार खांबी , सोळाखांबी सभामंडप तसेच मंदिराच्या प्रवेश द्वारावर आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे देवाला आज सकाळी पांढऱ्या रंगाचे वस्त्र आणि रुक्मिणीमातेला पांढऱ्या रंगाची रेशमी् साडी परिधान केली होती. देवाचे हे रुप पाहून सर्वांच्या डोळ्याचे पारणेच फिटले.

पंच Prabhakar Sail चा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती
Gudipadva 2022: फडके रोडवर गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन