‘पोलिसांच्या सगळ्या सुट्ट्या रद्द!’ पोलीस महासंचालकांची माहिती
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील (Maharashtra Police Department) सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पोलीस महासंचालकांनी पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सगळ्या सुट्ट्या रद्द केल्या असल्याचं म्हटलंय.
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील (Maharashtra Police Department) सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पोलीस महासंचालकांनी पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सगळ्या सुट्ट्या रद्द केल्या असल्याचं म्हटलंय. मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषेदत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यात 87 एसपीआरएफ, 30 हजारांवर होमगार्ड तैनात असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात महाराष्ट्र पोलीस सक्षम, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय.
Published on: May 03, 2022 02:46 PM