Rashmi Shukla : निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी पुन्हा नियुक्ती

| Updated on: Nov 26, 2024 | 12:34 PM

विधानसभा निवडणुका संपताच पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. काल रात्री राज्य सरकारकडून एक शासन आदेश जारी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन आठवड्यांपूर्वी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली केली होती. यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, आता विधानसभा निवडणुका संपताच पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. काल रात्री राज्य सरकारकडून एक शासन आदेश जारी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या आदेशात रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे म्हटले होते. तर आज मंगळवारपासून रश्मी शुक्ला या राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधकांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या फोन टॅपिंग प्रकरणामुळे रश्मी शुक्ला सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. याआधी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या चर्चेत आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी रश्मी शुक्ला अवैध पद्धतीने फोन टॅपिंग करत असल्याचा आरोप केला होता.

Published on: Nov 26, 2024 12:34 PM
एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार; नवा रोल काय?
Deepak Kesarkar : सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं… काय घडतंय?