शेकापच्या बड्या नेत्यानं हाती घेतलं भाजपचं कमळ, पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस म्हणाले…

| Updated on: Feb 28, 2023 | 5:47 PM

VIDEO | शेकापतील माजी आमदार भाजपमध्ये, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश, बघा काय केलं म्हणाले फडणवीस

मुंबई : शेकापचा बालेकिल्ला असलेल्या रायगडमधून महाविकास आघाडीला मोठा धक्का देण्यात आला आहे. शेकापच्या माजी आमदाराने लाल बावट्याची साथ सोडत भाजपात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपच्या पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी धैर्यशील पाटील यांना भाजप पक्षात योग्य संधी मिळेल, परक्यासारखी वागणूक मिळणार नाही, असे आश्वासन दिले. धैर्यशील पाटील यांच्यासोबत आलेले सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं मी मन:पूर्वक स्वागत करतो. सगळ्यांना संधी मिळेल. कोणाचाही संधी डावलली जाणार नाही. सर्वांना त्यांच्या ताकदीनुसार संधी मिळेल. आपल्याला सगळ्यांना मिळून एका दिशेने पुढे जायचं आहे या दृष्टीने काम करु, असेही फडणवीस म्हणाले.

Published on: Feb 28, 2023 05:46 PM
अंबादास दानवे यांचं पद धोक्यात? भाजप नेत्याचं सूतोवाच, बघा काय केलं खळबळजनक वक्तव्य
पुणे म्हणजे नादचं खुळा! नव वधू-वराची JCB मधून थेट जंगी मिरवणूक, बघा व्हिडीओ