एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, धैर्यशील मोहितेंचा कुणावर निशाणा?

| Updated on: Apr 15, 2024 | 10:09 PM

राम सातपुते यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना सडेतोड उत्तर देत असे म्हटले की, ऊसतोड कामगाराचा मुलगा आमदार झाला, भविष्यात खासदार होणार त्यामुळे खदखद बाहेर पडली. सोलापुरातील विकासकामांचे पार्सल घेऊन निश्चितपणे दिल्लीला जाईन, असे म्हणत धैर्यशील पाटील यांना राम सातपुतेंचं पलटवार

एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार असल्याचं वक्तव्य धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलं असून त्यांनी भाजपच्या राम सातपुते यांच्यावर निशाणा साधला आहे. तर सोलापुरकरांनी मला दिल्लीला पाठवायचं ठरवलं आहे, तसेच विकासकामांसाठी कागदपत्रांचं पार्सल घेऊन दिल्लीला जाईल, असं प्रत्युत्तर राम सातपुते यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलंय. राम सातपुते यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना सडेतोड उत्तर देत असे म्हटले की, ऊसतोड कामगाराचा मुलगा आमदार झाला, भविष्यात खासदार होणार त्यामुळे खदखद बाहेर पडली. सोलापुरातील विकासकामांचे पार्सल घेऊन निश्चितपणे दिल्लीला जाईन, असेही त्यांनी म्हटले. तर मी सोलापुरात टेक्स्टाईल, आयटी पार्क, दुष्काळी गावाला पाणी आणण्यासाठी कागदपत्रे निश्चितपणे पार्सल घेऊन जाईन. मी कामगाराचा मुलगा आहे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलो नाही. एका रात्रीत आमदार वगैरे ते जनता ठरवते. भाजपने काम केले होते म्हणून जनता सोबत आहे. मुळात मोहिते पाटलांचे नेतृत्व वळचणीला पडले होते, असा पलटवारही त्यांनी केला.

Published on: Apr 15, 2024 10:09 PM
माढ्यासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात, तर विशेष विमानाने ‘या’ 4 नेत्याची तडकाफडकी भेट
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये? बघा EXCLUSIVE अपडेट