परळी नगरी झाली राममय, रामलल्लाच्या नामानं मुंडे बंधू-भगिनीतील संघर्ष अन् दुरावा संपला

| Updated on: Jan 22, 2024 | 12:11 PM

राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परळीकरांनी आणि संपूर्ण बीड जिल्ह्यानं एक हवंहवंसं चित्र पाहिलं. परळीत श्रीराम उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवात परळीकरांसोबत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र सहभागी झाले.

मुंबई, २२ जानेवारी २०२४ : अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परळीमध्येही भव्य शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र पाहायला मिळाले. यावेळी दोघांनी एकत्र जेवण केलं यानंतर मुंडे भावा-बहिणीतील कटूता आता संपल्याचे स्पष्ट झालंय. राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परळीकरांनी आणि संपूर्ण बीड जिल्ह्यानं एक हवंहवंसं चित्र पाहिलं. परळीत श्रीराम उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवात परळीकरांसोबत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र सहभागी झाले. प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीतेच्या रुपात अवतलेली बच्चेकंपनी, पारंपरिक पेहराव करुन सहभागी झालेला महिलावर्ग आणि ढोल-ताशाच्या गजरात लेझीम खेळण्यात दंग झालेले नागरिक आणि परळीकरांनी केलेला जय श्रीरामाचा गजर यामुळे परळीतील वातावरणात राममय झालं होतं. अशात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी जुन्या आठवणींना उजाळाही दिला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jan 22, 2024 12:11 PM
राम मंदिर लोकार्पणाच्या पूर्वसंध्येला वार-पलटवार, देवेंद्र फडणवीस यांची कारसेवा अन् संजय राऊतांचं टीकास्त्र
Ayodhya Ram Mandir : ऐतिहासिक क्षणांचे व्हा साक्षीदार, अयोध्येतील रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा बघा LIVE