2017 ला कुठे, कशी बैठक झाली? हे व्हिडीओसहित सांगू शकतो, मुंडेंचा शरद पवारांबाबत गौप्यस्फोट
पुरंदरला धनंजय मुंडे आले असता त्यांनी हा जाहीरपणे मोठा गौप्यस्फोट केला. दिल्लीला कुणाच्या घरी शिवसेनेला बाजूला कसं काढायचं याच्या बैठका झाल्या. हे त्यांनी केलं. ते संस्कार दादांनी केलं तर गद्दारी, असा हल्लाबोलच धनंजय मुंडे यांनी केला.
2017 ला गणेश चतुर्थीच्या दिवशी कुठे? कशी? बैठक झाली, दिल्लीला कुणाच्या घरी शिवसेनेला बाजूला कसं काढायचं याच्या बैठका झाल्या हे व्हिडिओसहीत मी देऊ शकतो, असं वक्तव्य करत धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केल्याचे पाहायला मिळाले. पुरंदरला धनंजय मुंडे आले असता त्यांनी हा जाहीरपणे मोठा गौप्यस्फोट केला. दिल्लीला कुणाच्या घरी शिवसेनेला बाजूला कसं काढायचं याच्या बैठका झाल्या. हे त्यांनी केलं. ते संस्कार दादांनी केलं तर गद्दारी, असा हल्लाबोलच धनंजय मुंडे यांनी केला. ते पुढे असेही म्हणाले, ‘ते सांगतायत शिवसेनेला आम्ही भाजपपासून लांब केलं. ती आमची चाल होती आणि उद्धव ठाकरे हसतायत. किती ही हतबलता. त्यावेळी राष्ट्रवादीच्या 53 पैकी 53 आमदारांनी भाजपला समर्थन दिलं होतं. त्यांनी कागदावर सह्या केल्या होत्या. दादा हा कागद तुम्हाला दाखवतील की नाही माहीत नाही. पण कधी तरी मी तो कागद दाखवणार आहे’, असे धनंजय मुंडे म्हणाले.