मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवरून वार-पलटवार, रोहित पवार यांची टीका तर धनंजय मुंडे म्हणतात…
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तुफान व्हायरल होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या पत्रकार परिषदेच्या व्हिडीओवरून विरोधकांचा राज्य सरकारवर घणाघात, रोहित पवार यांची टीका तर धनंजय मुंडे यांनी काय केलं भाष्य?
मुंबई, १३ सप्टेंबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या पत्रकार परिषदेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्हायरल व्हिडीओवर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्या व्हिडीओचा निषेध केला आहे. ते म्हणाले, ‘समाजाच्या हक्कासाठी कोणी उपोषणाला बसत असतं. अशावेळी जर सरकार केवळ बोलत असेल बोलून मोकळं व्हायचं याचा अर्थ सरकार केवळ राजकारण करत आहे.’, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे तर व्हायरल व्हिडिओबद्दल काय बोलायचं हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील. विजय वडेट्टीवार हा व्हिडिओ व्हायरल करत आहेत. पण जरांगे पाटील यांनी केलेली मागणी वडेट्टीवार यांना मान्य आहे का? की त्यांना फक्त व्हिडिओ व्हायरल करून समाजाच्या भावना दुखवायचं आहेत? असा सवाल धनजंय मुंडे उपस्थित केला आहे.