निवडणूक कोल्हापुरची तर चर्चा मात्र परळीची
गेल्या काही वर्षापासून आपले आणि धनजंय मुंडे यांचे प्रेमसंबंध होते, आणि त्यावर आता मी पुस्तक लिहिले आहे. ते पुस्तक दोन भाषेत येत असून त्याचा पुस्तक प्रकाशनाचा मोठा कार्यक्रम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
निवडणूक कोल्हापुरची आहे तर चर्चा मात्र परळीची आहे. धनजंय मुंडे यांच्यामुळे चर्चेत आलेल्या करुणा शर्मा यांनी कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे सध्या कोल्हापुरची ही निवडणूक चर्चेत आली आहे. धनजंय मुंडे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीत खरी माहिती लपवल्याचे करुणा मुंडे सांगतात. धनजंय मुंडे आणि आपल्यावर जर सिनेमा आला तर तो प्रचंड चालेल असंही त्यांनी कोल्हापूरात बोलताना सांगितले. गेल्या काही वर्षापासून आपले आणि धनजंय मुंडे यांचे प्रेमसंबंध होते, आणि त्यावर आता मी पुस्तक लिहिले आहे. ते पुस्तक दोन भाषेत येत असून त्याचा पुस्तक प्रकाशनाचा मोठा कार्यक्रम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.